Amravati to Pune Railway

अमरावती-पुणे रेल्वे गाडी दररोज सुरु

अमरावती-पुणे रेल्वे गाडी दररोज सुरु करणे बाबत पत्र!

आपल्या लातूर जिल्ह्यातून जाणारी अमरावती-पुणे (०१४४०) ही रेल्वे गाडी दररोज सुरु करण्यात यावी, यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री मा.नाश्री. Ashwini Vaishnaw साहेब यांना पत्र लिहून विनंती केली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री. Raosaheb Patil Danve साहेब यांना देखील प्रत्यक्ष भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडला असून लवकरात लवकर ही रेल्वे नियमित सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अमरावती-पुणे ही गाडी सध्या आठवड्यातून दोन दिवस धावते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या गाडीचा आपल्या भागातील आणि अमरावती, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाला फार मोठा फायदा होतो. त्यामुळे ही गाडी नियमित सुरु करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची गरजच ओळखून या विषयाचा पाठपुरावा केला जात आहे.