निलंगा येथे आ.आक्कांच्या उपस्थितीत बळीराजाच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारी ‘वेळ अमावस्या‘ सहकुटुंब, शेतकरी बांधवांसह साजरी केली.

निलंगा येथे आ.आक्कांच्या उपस्थितीत बळीराजाच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारी ‘वेळ अमावस्या‘ सहकुटुंब, शेतकरी बांधवांसह साजरी केली.
काळ्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृती मधील, विशेषत: मराठवाड्यातील हा एक महत्त्वाचा मराठमोळा सण..
ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खीर, आंबिल इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला व त्यानंतर वनभोजन करून या प्रसादाचा आस्वाद घेतला..