पुरस्कार वितरण सोहळा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षकरत्न आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा 2023, वृंदावन मंगल कार्यालय, निलंगा येथे आनंदात पार पडला.

आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर योग्य संस्कार करून त्यांना समाजात वावरण्यासाठी योग्य ज्ञान देण्याची महत्वाची जबाबदारी, आपले शिक्षक वृंद आणि शाळा पार पाडत असतात. त्यांना शिक्षकरत्न आणि उपक्रमशील शाळा अशा पुरस्काराने गौरविण्यात येणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षकांची जबाबदारी आता वाढलेली असून भविष्यातील उज्वल भारत घडविण्यासाठी आपले योगदान आणखी जोमाने निश्चित द्याल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्णजी तांबारे, तहसीलदार उषाकिरणताई शृंगारे, उपमुख्य कार्यकारी दत्तात्रयजी गिरी, मुख्याधिकारी अनमोलजी सागर, यांच्यासह अधिकारी भाजप उपजिल्हाध्यक्ष शेषेराव मंमाळे, निलंगा विधानसभा निवडणुक प्रमुख दगडूजी सोळुंके आणि तालुक्यातील प्रतिष्ठित शिक्षक वृंद उपस्थित होते.