‘माझे लातूर’ परिवारासोबत मी कायम आहे!
लातूर येथे मंजूर असलेले जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे, या मागण्यांसाठी ‘माझे लातूर’ परिवारातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोंबरपासून लातूर येथील महात्मा गांधी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
जिल्ह्याचा व सरकारचा लोकप्रतिनिधी या नात्याने संबंधित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा तसेच सरकारतर्फे बैठक आयोजित करून त्यासाठी परिवाराच्या सदस्यांना निमंत्रणाचे आश्वासन दिले. तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा.ना.श्री. तानाजीराव सावंत साहेब यांना फोनवरून संपर्क करून त्यांना या घटनेविषयी माहिती दिली. तसेच याबाबत बैठक आयोजित करण्याची विनंती केली. सदर विनंतीला मान देत आरोग्य मंत्र्यांनी लवकरात लवकर या बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि या बैठकीला ’माझे लातूर’ परिवारातील सदस्यांना निमंत्रण देण्याचा विश्वास दिला. यानंतर माझ्या विनंतीला मान देत परिवाराने उद्या साखळी उपोषण मागे घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माझे लातूर परिवाराचे दिपरत्नजी निलंगेकर, अभयजी मिरजकर, सतीशजी तांदळे, सितमजी सोनवणे, काशिनाथजी बळवंते, विजयजी स्वामी, मासूमजी खान, के वाय पटवेकरजी, संजयजी स्वामी, अरुणजी हांडे, प्रमोदजी गुडे, बाबाजी शेख, पिंटूजी निलंगेकर, सिद्धलिंगजी गुजर यांच्यासह भाजपा शहर जिल्ह्याचे सरचिटणीस ऍड. दिग्विजयजी काथवटे, शिरीषजी कुलकर्णी, कोषाध्यक्ष धनराजजी साठे, माजी नगरसेवक अजितजी पाटील कव्हेकर, भाजपायुमोचे शहराध्यक्ष गणेशजी गोमसाळे, संतोषजी तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.





