यशोगाथा

राज्याच्या चार खात्यांचा कारभार सांभाळत असताना लातूर जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून संभाजी पाटील निलंगेकर हे काम करीत आहेत. घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे त्यांचे निलंगा विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघातील सर्वच घटकांना सोबत घेऊन विकास सुरू केला आहे. या मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
Yashogatha

"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात."

अन शेतकऱ्यांना मिळाला मावेजा
मांजरा नदीवर धनेगाव येथे बॅरेजेस उभारण्यात आला आहे. बॅरेजसमध्ये पाणी थांबून या भागाचा विकास होईल याकरिता शेतकऱ्यांनी कोणत्याही तक्रारी न करता शासनाला जमिनी दिल्या. हे बॅरेजेस तयार करून दहा बारा वर्षे झाली तरी त्याचा मावेजा मात्र शेतकऱ्यांना मिळत नव्हता. शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासनदरबारी हेलपाटे घातले तरी त्यांच्या पदरी निराशाच आली. पण पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील-निलंगेकर यांनी पहिल्यांदा या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत या शेतकऱ्यांना ५४ कोटींचा मावेजा मिळवून दिला.

निलंग्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट
एखाद्या शहराला नेतृत्व चांगले मिळाले की त्या शहराचा विकास होण्यास काहीच वेळ लागत नाही. असेच काहीसे निलंगा शहराच्या बाबतीत झाले आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपाने या शहराला तरुण नेतृत्व मिळाले. त्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने शहरासाठी अधिकच फायद्याचे ठरले. श्री. निलंगेकर यांनी निलंगा शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटच तयार केली आहे. यातून नगरपालिकेच्या माध्यमातून १७५ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. काहीच्या कामालाही सुरुवात झाली आहे. स्वच्छ व सुंदर निलंगा शहर करण्यासाठी ठिकठिकाणी उद्यान, सुशोभीकरण, अटल वॉक, जिजाऊ सृष्टी असे विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले. लहान मुलांसाठी साडे चार कोटी रुपये खर्चून ॲमेझिंग पार्क उभारण्यात आले.

८४ कोटीची पाणी योजना
लातूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत. त्याला निलंगाही अपवाद नाही. पण निलंगा शहराला कायमस्वरूपी व चोवीस तास पाणी देण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न सुरू केले. यातून त्यांनी निलंगा शहरासाठी माकणी धरणातून नवीन पाइपलाइन मंजूर करून घेतली. ही योजना ८४ कोटी रुपयांची आहे. या योजनेचे काम झाल्यानंतर निलंगा शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
Yashogatha

"स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात."

देशभक्ती आणि सामाजिक ऐक्य
निलंगा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करीत असताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी लहान मुले, तरुणात देशभक्तीची भावना जागृत करणे व सामाजिक ऐक्य कसे टिकून राहील याकरिता विशेष प्रयत्न केले. यातून निलंगा येथे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा १०५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला. ज्या महामानवाने भारताला राज्यघटना दिली ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. नवीन पिढीला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वच समाजघटकांचा विकास
सर्वच समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्वच पुढे मोठे होत असते. त्याच पद्धतीने संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपली विकासाची वाटचाल ठेवली आहे. केवळ एका समाजाचा विचार न करता त्यांनी सर्वच समाजघटकांचा विचार करून त्या त्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन कामे केली आहेत. यात प्रामुख्याने मुस्लीम समाजासाठी शादीखाना, संगमबसव विरक्त मठ सभागृह,माहेेशरी भवन, पिरपाशा दर्ग्याचा विकास अशी अनेक कामे त्यांनी केली.

निलंगा रेल्वेच्या नकाशावर आणण्याचे स्वप्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे संभाजी पाटील निलंगेकर यांचे चांगले संबंध आहेत. या संबंधाच्या जोरावरच त्यांनी देशातील चौथा रेल्वे बोगी कारखाना लातूरला आणला. मराठवाड्याचा कायापालट करणाऱ्या या कारखान्याची उभारणी प्रगतिपथावर आहे. आता श्री. निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघाला रेल्वेच्या नकाशावर आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. लातूर रोड ते गुलबर्गा या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
Yashogatha

"मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात."

राष्ट्रीय महामार्गावरही निलंगा
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरवण्याचे काम पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. पण निलंगा मतदारसंघातून एखादा तरी राष्ट्रीय महामार्ग गेला पाहिजे. निलंगा हे राष्ट्रीय महामार्गावर आले पाहिजे याकरिता त्यांनी प्रयत्न केले. यातूनच राष्ट्रीय महामार्ग ७५२ के हा परभणी – गंगाखेड – किनगाव – घरणी – नळेगाव – बाभळगाव – निटूर – निलंगा – जहिराबाद हा राष्ट्रीय महामार्ग त्यांनी मंजूर करून घेतला. याचे काम प्रगतिपथावर आहे.

लोककल्याणकारी महायज्ञ
निलंगा मतदारसंघाचा विकास करीत असतानाच संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे लोककल्याणकारी विश्वशांती महायज्ञ केला. यात ५१ हजार जोडप्यांच्या हस्ते महायज्ञात आहुती देण्यात आली. दुष्काळग्रस्त भागात पर्जन्यवृष्टी व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. या महायज्ञाच्या काळात सुमारे एक लाख वृक्षांचे वाटप करण्यात आले. स्वतःच्या कल्याणासाठी अनेक जण यज्ञ करतात, पण समाजाच्या कल्याणासाठी झालेला हा सर्वांत मोठा महायज्ञ ठरला.