राष्ट्र सर्व प्रथम 

आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेली माणसं भारतीय जनता पार्टीत बहुसंख्य आहेत. मुळातच भारतीय जनता पार्टीचे “राष्ट्र सर्व प्रथम” हे ब्रीदवाक्यच राष्ट्रवादाचा मूलमंत्र सांगून जाते. माझ्या राजकीय जीवनास प्रारंभ केल्यापासून मी सदैव भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो आहे. पक्षाच्या विचारधारेचे मूल्य, त्याचे सार्वजनिक जीवनातले महत्त्व मी जाणतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी १८-१८ तास अविरत काम करत, आपल्या कुशल नेतृत्वाने जगाला भुरळ पडेल असा भारत घडवत आहेत. देशात नवीन रोजगार निर्मिती होत आहे. परकीय गुंतवणूक वाढीस लागली आहे. त्यांच्या याच कार्यशैलीचा प्रभाव पडून इतरही पक्षातील अनेक नेते भारतीय जनता पक्षात मोठ्या संखेने दाखल होत आहेत.  

एकनिष्ठ विचारधारा असलेले संघटनच एक सशक्त राष्ट्र निर्मिती करू शकते. आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला भारतीय जनता पक्ष अशाच एकनिष्ठ विचारांच्या मुळावर उभा आहे. राजकीय जीवनात वावरताना तुम्हाला अनेकदा प्रलोभनांना सामोरे जावे लागते. पण अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक असलेली मंडळी कधीच विचलित होत नाहीत. इतिहासाची पाने उलगडून बघितली तर लक्षात येईल की, भारतीय जनता पक्ष काही  वर्षे सत्तेबाहेर असताना देखील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारखे जेष्ठ नेते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अशी विचार जपणारी माणसं कधीच आपल्या तत्वांशी तडजोड करत नाही. हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. आज देशात राष्ट्रवादाच्या विचारधारेला प्रमाण मानून चालणारा एक बलाढ्य पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे.       

देशाला अमृतकाल बहाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शासन काळात नव्या संधीचे जाळे वेगाने निर्माण होत आहे. देशवासियांना राष्ट्रप्रेमाचे नवे स्फुरण चढलेले दिसत आहे. आदरणीय मोदिजींच्या नेतृत्वाने भारत महासत्ता होण्याच्या दिशेला वेगाने वाटचाल करत आहे.