लातूरच्या विकासाचे पायलट आमदार संभाजी पाटील निलंगेकर

            

लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक थोर नेते दिले. यामध्ये दोन मुख्यमंत्री देखील दिले. त्याच बरोबर कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध कलाकार आणि लेखक मंडळी सुद्धा लातूरने दिली आहेत. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाची पदे भूषवलेल्या लातूर जिल्ह्याची विकासाच्या मार्गावरील वाटचाल इतर जिल्ह्यांच्या तुलनेने जरा संथ गतीनेच झालेली दिसते. याच संथ गतीला चालना देण्यासाठी विधानसभेची तिसरी टर्म गाजवत असलेले, लातूरचे लोकप्रिय आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे विशेष प्रयत्न करत असतात.  

एक व्यावसायिक पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेले आमदार संभाजी पाटील निलंगेकर अतिशय अभ्यासू राजकारणी आहेत. त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा तसेच अनुभवाचा वापर लातूरच्या विकासासाठी ते अग्रक्रमाने करत असतात. कोणत्याही साचेबद्ध राजकारण्याप्रमाणे केवळ आलिशान गाड्यांतून न फिरता थेट जनतेमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत जनतेच्या काळजाला स्पर्श करून जाते. फार कमी लोकांकडे असा सहजभाव असतो. आमदार संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने फक्त लातूरच्याच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा आग्रह धरत असतात.

मराठवाड्यातील तरुणांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी लातूरला रेल्वे बोगी कारखाना आणला. मराठवाड्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी यासाठी वॅाटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून आणला आहे. त्याच बरोबर लातूर जिल्ह्याचा पर्यावरणचा समतोल ढासळू नये म्हणून सामाजिक वृक्षारोपणाचा उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. मराठवाड्याचा कायापालट करायचा असेल तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सारख्या प्रभावी नेतृत्वाची नितांत गरज आहे.

लातूरला विविध क्षेत्रात प्रगती पथावर नेण्यासाठी अलीकडेच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने जन जागर मंचची स्थापना केली. याद्वारे कृषी, महिला आणि बालकल्याण, पर्यावरण, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य, समाज कल्याण आणि सुरक्षा, उद्योग आणि रोजगार, पाणी व्यवस्थापन, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ मंडळींना एकाच व्यासपीठावर आमंत्रित करून जन जागर संवादाचे आयोजन केले होते. लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा पद्धतीने वैचारिक जागर प्रथमच बघायला मिळाला होता. या संवादाच्या माध्यमाने अनेक अभ्यासू विचारवंतांनी लातूरच्या विकासासाठी विचारमंथन केले. यातून विकासाची नवरत्ने बाहेर आली. याचा लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.        

आज लातूर जिल्ह्याकडे केंद्र शासनाचा एक महत्वाचा रेल्वे बोगी प्रकल्प आहे. त्याच्या माध्यमातून किमान ४५ हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. अशा प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने पाठपुरावा करत असतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी ते विविध कल्पक उपक्रम त्यांच्या मतदारसंघात आयोजित करत असतात. २०४७ साली भारत १००व्या वर्षात प्रवेश करेल, तेव्हा असलेला शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आपल्या देशाला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सारख्या दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांना उदंड यश लाभो.