विकासाची नवी उड्डाणे!

देशाचे लाडके पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदिजींच्या प्रभावशाली नेतृत्वाने मागील दहा वर्षात महाराष्ट्राची वेगवान प्रगती झाली आहे. देशातील उद्योगांना अधिक चालना मिळावी यासाठी आपल्या राज्यात अनेक विमानतळांचा कायापालट झालेला दिसतोय. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये यामुळे कमालीची वाढ झाल्याची दिसत आहे. हे सारे केवळ, मोदिजींच्या दूरदृष्टीने शक्य झाले आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अलीकडेच वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना विद्यमान विमानतळांचा विस्तार आणि नवीन विमानतळांचा विकास वेगाने सुरू राहील, असे विधान केले आहे. पुढे त्यांनी अशीही पुष्टी जोडली की, गेल्या 10 वर्षात विमान वाहतूक क्षेत्र कमालीचे वाढले आहे आणि विमानतळांची संख्या दुप्पट होऊन 149 वर पोहोचली आहे.

मित्रांनो, केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत टियर-टू आणि टियर-थ्री शहरांमध्ये हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. या सुविधेमुळे एकूण 517 नवीन मार्गांवर 1.3 कोटी प्रवासी प्रवास करत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले आहे की, केंद्र सरकारने देशात एकूण २१ नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांच्या स्थापनेला ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग आदी विमानतळांचा समावेश आहे. ही विमानतळे देशाच्या विमानचालनाचे स्वरूप बदलण्यात आणि विविध प्रदेशांतील प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. 

गेल्या ६० वर्षांपासून देशातील नागरिक मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ ही दोन शहरे जोडलेले पाहू इच्छित होते. पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदिजींनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे लोकार्पण करुन तमाम देशवासीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान नवी मुंबर्इ आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होर्इल. या विमानतळामुळे नवी मुंबर्इचा मोठ्या प्रमाणात विकास होर्इल. यामुळे व्यापाराच्या तसेच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे. पंतप्रधान मा.ना.श्री. मोदिजींनी नुकतेच पुणे आणि कोल्हापूर या विमानतळांवरील नवीन टर्मिनसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. देश विदेशातून दररोज अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी येथील जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाने याबाबत सहकार्य करून नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध केली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे. महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे नितांत सुंदर दर्शन या इमारतीत घडते. एकूणच आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण या इमारतीत आहे. याच धर्तीवर कोल्हापूरला देखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे राहत आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून मला या गोष्टींचा आनंद वाटतो. राज्यातील ही विकासाची नवीन उड्डाणे अशीच वाढत राहो. हीच मंगल कामना!