शिक्षण गंगा घरोघरी नेणारे नेतृत्व 

काही माणसे जन्मतःच मोठेपणा घेऊन येतात. त्यांच्या मोठेपणाची व्याप्ती इतकी मोठी असते की त्यांना मिळणारे मान सन्मान त्यांच्या कार्यापुढे छोटे वाटतात. आपल्या सामाजिक कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटवणारे असेच एक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे आमदार संभाजी पाटील निलंगेकर. लातूर जिल्ह्यातील एक कार्यक्षम नेतृत्व. लातूर जिल्ह्यातील निलंगेकर कुटुंबीय तसे सर्वांनाच परिचित आहे. आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, वडील स्व. दिलीपराव पाटील माजी आमदार तर मातोश्री रूपाताई पाटील निलंगेकर माजी खासदार म्हणून कार्यरत होत्या. लोकसेवेचा समृद्ध वारसा लाभलेल्या परिवारात संभाजी पाटील वाढले आहेत. समाजकारण आणि राजकारण अगदी लहानपणापासून बघत आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना कायम आपुलकीने भेटणारे संभाजी भैय्या जनतेला कायम आपले वाटतात.

लोकांनी दिलेले भरभरून प्रेम संभाजी भैय्यांचा समाजसेवेचा आनंद द्विगुणीत करते. माणूस एकदा राजकारणात गेला की तो आश्वासनांची नुसती खैरात वाटत असतो. पण संभाजी भैय्यां सारखे काही सन्मानीय अपवाद सुद्धा असतात. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी आजवर विकास कामांचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु केला आहे.  

स्वतः भोवतीचे नेते पदाचे वलय तोडून जनमाणसांत अगदी सहजपणे मिसळून जाणे त्यांच्यासाठी नित्याची गोष्ट झाली आहे. त्यांच्या याच साध्या वागणुकीमुळे मतदारसंघातील नागरिक विना संकोच आपल्या अडचणी त्यांच्या समोर मांडतात. शब्दांचा उगाच पसारा न मांडता आटोपशीर शब्दांत मुद्देसूद बोलणे आणि प्रत्येक कार्याची नियोजनबद्ध आखणी हे त्यांचे गुणविशेष आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध आखणीद्वारे लातूर जिल्ह्याचा कायापालट वेगाने होत आहे.

आपल्या देशात एक अब्जाहून अधिक लोक आहेत आणि त्यापैकी फक्त एक तृतीयांश लोकांनाच लिहायला आणि वाचायला येते. यामागची कारणमीमांसा शोधायला गेलो तर आपल्या लक्षात येते की आपल्या ग्रामीण भागात असलेला मूलभूत सुविधांचा अभाव, अपुरी संसाधने, पुस्तके आणि शिक्षक, शैक्षणिक खर्चासाठी अपुरा सार्वजनिक निधी इत्यादी. त्याचबरोबर बेसुमार वाढती लोकसंख्या हे देखील आपल्या देशासमोरील एक प्रमुख आव्हान आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक लोक शिक्षणापासून वंचित आहेत. आर्थिक अडचणी असल्याने कित्येक मुला मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. भारतातील बालमजुरीची प्रथा आणि देशाच्या अनेक भागांमध्ये मुलींना शाळेत पाठवण्याला होणारा विरोध ही खरी चिंता आहे. या लाखो वंचित मुलांना शाळेपर्यंत घेऊन येऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावणे. ही काळाची गरज आहे. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली पाहिजे.  

आमदार संभाजी पाटील निलंगेकर अक्का फाऊंडेशन द्वारा समाजातील अशाच गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात. बचत गटांच्या माध्यमातून वंचित बालकांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य पुरवतात. त्याच बरोबर तरुण मुला मुलींना सरकारी नोकरीसाठी  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतात. यामुळे ग्रामीण भागातील अल्प उत्त्पन्न असलेल्या घरातील कित्येक मुला मुलींच्या आयुष्याला एक दिशा देण्याचे कार्य घडत आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आज अनेक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत.  

शिक्षण हे असे शस्त्र आहे, हे ज्याच्या हाती असेल तो व्यक्ती आयुष्यात प्रगती करतो. शिक्षणाचे हेच महत्व समजून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी सर्वोतपरी मदत करण्याचे धोरण आखले आहे. कारण शिक्षणानेच आयुष्यातील अंधकार दूर होऊन उत्कर्षाच्या नव्या प्रकाशवाटा सापडतील.