“आजपर्यंत केलेले सर्व विकासकार्य जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे होऊ शकले आहे. विकासाचा अजून मोठा पल्ला आपल्याला गाठावयाचा असून त्याकामी आपले सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे”

राणीअंकुलगा (साकोळ सर्कल) येथे बूथ मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी विधानसभा श्री.निरिक्षक राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष श्री.प्रकाश कोरे, सभापती वर्षा जाधव, सभापती श्री.अजित माने, ॲड.संभाजी पाटील, जि.प.सदस्य गोविंद चिरकुरे, उद्धवराव जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, दंगडू सांळुके, ऋषिकेश बद्दे आदींची उपस्थिती होती.