इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजना

इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजना

बांधकाम कामगारांना सकस देण्यासाठी कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात अटल आहार योजनेव्दारे देण्यात येणार, यासाठी राजशासनाची विशेष मोहीम.

बांधकाम कामगारांना हक्काचे घर

अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. याअंतर्गत बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय.

इमारत व इतर बांधकाम कामगारांची विक्रमी नोंदणी करणारे देशातील एकमेव राज्य

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने वर्ष २०१९ पर्यंत १६,१०,६१९ इतकी देशातील सर्वात जास्त विक्रमी नोंदणी करण्यात आली असून, विविध २८ योजनांच्या मध्यानातून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यात येत आहे. विविध योजनांत लाभ वाटप केलेल्या लाभार्थींची संख्या १२,३२,९०३ इतकी असून, ५९८.०९ कोटी रुपयांचे लाभ वाटप पूर्ण.