December 16, 2019

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

या अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत असून, या अभियानानुसार मंडळाने आज पर्यंत लाभार्थ्यांना ९,४५,५७,०४३ एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य विविध योजनांच्या माध्यमातून केले असून, यात वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I), गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) व  प्रकल्प कजण योजना (GL-I) यांचा समावेश आहे.

पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM)

यानुसार १५ ते ४५ वयोगटातील शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, दिव्यांग त्याचप्रमाणे महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगार/ स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण २,२०,१४७ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले असून, १,४६,९६१ चे मूल्यमापन झालेले आहे. त्यानुसार ५२,११० रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) “कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र” या ध्येयपूतीसाठी करण्यात आले, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. या योजनेनुसार सन २०१५-१६ ते२०१८-१९ दरम्यान एकूण १,७३,४६९ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले असून,  १,६९,६८५ प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन झाले आहे. त्यानुसार ६५,२७४ रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.

कौशल्यातुन रोजगार निर्मितीकडे

अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून याअंतर्गत दरवर्षी जवळजवळ ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उदिदष्ट ठरविण्यात आले आहे. २०२२ पर्यंत ४.५  कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष. रोजगार व स्वयंरोजगार व कौशल्य विकासासंबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

कौशल्य विकासात महाराष्ट्र देशात अग्रेसर

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळ व राज्य औद्योगिक प्रशिक्षण सौंस्था व राज्य नाविन्यता परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोक उपयोगी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात कौशल्य विकासात महाराष्ट्र देशात अग्रेसर.