April 2020

शरण स्वामी बसवेश्वर अण्णांच्या चरणाशी… जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…

शरण स्वामी बसवेश्वर अण्णांच्या चरणाशी… जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले… समता, एकता, सुसंवाद, बंधुता आणि विवेक यांची शिकवण देऊन “शरण चळवळ” उभारली, आणि खऱ्या अर्थाने धर्म स्थापना केली. त्यांची मुल्ये आणि आदर्श, त्यांचा भक्तिमार्ग, त्यांची शिकवण आजच्या कठीण प्रसंगातही आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते. आज आपल्यावर आलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांच्या मानवतावादी विचारांचीच …

शरण स्वामी बसवेश्वर अण्णांच्या चरणाशी… जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले… Read More »

“अक्का फौंडेशनच्या” माध्यमातून 5000 गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य

आपली सामाजिक संस्था “अक्का फौंडेशनच्या” माध्यमातून 5000 गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन सुरु असलेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम दैनंदिन मिळकतीवर जीवन अवलंबून असणाऱ्या कामगार आणि मजूर वर्गावर सर्वाधिक झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मूलभूत जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचावी या कर्तव्य भावनेतून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार …

“अक्का फौंडेशनच्या” माध्यमातून 5000 गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य Read More »

जे पिकेल ते गरजुंसाठी..

जे पिकेल ते गरजुंसाठी.. शेतामधील पौष्टिक सिमला/ढोबळी मिरचीचे पिक काढण्यात आले. सर्व पिक गरजूंना मोफत वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा कार्यकाळ पाहता अन्नधान्यासोबत पौष्टिक भाज्यांची ही आवश्यकता असणार आहे.. विशेषकरून लहान बालकांसाठी.. त्यांच्यासाठी एक प्रयत्न असाही.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांचे आरोग्य, रेशनिंग व्यवस्था आणि राठोडा येथील साधकांची परिस्थिती

जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन नागरिकांचे आरोग्य, रेशनिंग व्यवस्था आणि राठोडा येथील साधकांची परिस्थिती; यासंदर्भात आढावा व उपाययोजना याबाबत चर्चा करून आवश्यक दिशादर्शक सूचना करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये प्राधान्याने आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे याची माहिती घेऊन, ती अधिक गतिमान करण्याची सूचना केली. रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज …

जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांचे आरोग्य, रेशनिंग व्यवस्था आणि राठोडा येथील साधकांची परिस्थिती Read More »

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शतश: नमन…

आपण केलेला संघर्ष, आपण दिलेला विचार आणि आपण सांगितलेले संविधानिक मूल्य यांच्या आधारावर भारतात एकता, समता आणि बंधुता अखंड राहावी… भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शतश: नमन…

लातूर जिल्ह्यातील 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना रेशन धान्यांची वाटप सुरू

लातूर जिल्ह्यातील 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना रेशन धान्यांची वाटप सुरू.. सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनामार्फत सर्व सामान्यांस जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेशन धान्य वाटपास लातूर जिल्ह्यात सुरुवात झाली असून, अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना, एपीएल शेतकरी, उर्वरित एपीएल व शुभ्र कार्ड धारकांना याचा लाभ मिळत आहे. तरी सामाजिक सुरक्षेच भान ठेवून, सुरक्षित अंतराद्वारे सर्व …

लातूर जिल्ह्यातील 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना रेशन धान्यांची वाटप सुरू Read More »

आपल्यासाठी अविरत कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याला सलाम..!

एक दिवा आशेचा.. ऐक्याचा.. आरोग्याचा.. माझ्या परिवाराचा.. माझ्या देशवासीयांसाठी.. आपल्यासाठी अविरत कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याला सलाम..! त्यांच्या कार्यासाठी एक परिवार म्हणून आपण केलेला हा प्रतीकात्मक उपक्रम.. त्यांच्या निस्वार्थ कार्याला अर्पण..

मा.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद

मा.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद : निलंगा वासीयांची रक्तदानातून शासनास मदत..! लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता भासू लागल्याने मा.जिल्हाधिकारी, लातूर यांनी रक्तदानासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे आमचे बंधू श्री.अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतः रक्तदान करत या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेसाठी तब्बल ४०० जणांनी नोंदणी केली असून, रक्ताची …

मा.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद Read More »