कार्यतत्पर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची सदिच्छा भेट घेतली !
मागील अडीच वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे लातूर जिल्ह्यात त्यांची ओळख कार्यतत्पर अधिकारी म्हणून निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून त्यांनी राबविलेले ‘मिशन दिलासा’ राज्यभर गाजले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची राज्य शासनानेही दखल घेतली होती. त्यांच्या ‘अँटी कोरोना पोलिस’ आणि ‘अँटी कोरोना फोर्स’ या उपक्रमांचे इतर जिल्ह्यांनीही अनुकरण केले…
लातूर जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.