देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रकांतदादा पाटील जी यांनी लातूर येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, त्यांना पक्ष आपलासा वाटावा यासाठी कार्य करावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पा कराड जी, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुधाकरजी भालेराव, किसान मोर्चा सरचिटणीस श्री.दिलीपराव देशमुख जी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे सदस्य श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर जी, संघटन मंत्री श्री.संजयजी कोडगे, प्रदेश प्रवक्ते श्री.गणेशजी हाके, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. संजयजी दोरवे, शहर संघटन सरचिटणीस श्री.मनीषजी बंडेवार, जिल्हा चिटणीस श्री.किरणजी उटगे, माजी आमदार श्री.विनायकराव पाटील जी, भाजपा युवा मोर्चा सचिव श्रीमती प्रेरणाताई होनराव, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रीमती स्वातीताई जाधव तसेच भाजपा परिवारातील सदस्य, मंडळ अध्यक्ष व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.