ईदगाह मैदान येथे सभागृह तथा शादिखाना लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
अत्यंत भव्य स्वरूपात झालेल्या या सोहळ्यात सय्यद जुल्फेर नयन या चिमुकल्याने सादर केलेले देशभक्तीपर गीत सर्वात लक्षवेधी ठरले.
सर्वसमावेशक विकास हा केंद्रस्थानी ठेऊन सातत्याने कार्यरत राहण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ॲड.सय्यद गुलजार अली साहेब, प्रमुख अतिथी म्हणून सज्जदा नशिन दर्गाह दादापीर (रहे.), श्री.सय्यद शाह हैदरवली नबीरा काद्री, सज्जदा नशीन दर्गाह पिरपाशा (रहे.), श्री.सय्यद शाह युसूफउल्हाह काजी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, माजी समाजकल्याण सभापती तथा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, श्री.शेषरावजी मामले सर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, माजी नगराध्यक्ष श्री.हमीदजी शेख तसेच नगरसेविका इश्रद सौदागर जी, श्री.रफिकभाई सौदागर, श्री.रब्बानी चौधरी, श्री.इस्माईल लदाफ, श्री.नसीम खातीब, श्री.फारुक शेख, जाफर अन्वी आणि पत्रकार बांधव, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.