निळकंठेश्वर मंदिर देवस्थान भक्त निवास व श्री बालाजी मंदिर देवस्थान सभागृह लोकार्पण करून निळकंठेश्वर आणि श्री बालाजी चरणी सेवा समर्पित केली.
भक्त निवासामुळे विविध ठिकाणाहून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची सोय तर होईलच तसेच स्थानिक भक्तांना कार्यक्रम आणि उपक्रमासाठी हक्काचे सभागृह यामुळे उपलब्ध होणार आहे. भक्तांची सेवा हीच ईश्वर सेवा करण्याची पहिली पायरी असते. या दृष्टिकोनातून हे कार्य विशेष समाधान देणारे ठरते.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, मुख्य अधिकारी श्री.सुंदरजी बोंदर, नगराध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळै, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी बाहेती, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, श्री.संजयजी दोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.