गुरूबाबा महाराज सांस्कृतिक सभागृहाचा तर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पिरपाशा दर्गा येथे उभारण्यात आलेल्या सभागृहाचे व निजामोद्दीन दर्गा शेडचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.‌
यावेळी टाळ-मृंदागाच्या गजरात समाधी स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली तर मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जनतेच्या श्रद्धा स्थानांबरोबरच सर्वांगीण विकासाचे कार्य करण्याची संधी निलंगेकर परिवाराला कायम मिळत आली आहे, हे मी माझे भाग्य समजतो. अखंड आणि अविरत कार्य करून जनसेवेसाठी स्वतःला झोकून देणे हेच तत्व मी माझे आजोबा स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि आदरणीय अक्कांकडून शिकलो आहे.
भागवत धर्माचे पालन करत आपल संपूर्ण आयुष्य वाहणारे गुरूबाबांच्या नावाने सभागृह निर्माण झाल्याने भागवत धर्माला अधिक बळकटी प्राप्त होईल यात शंका नाही. बाबांचा आशीर्वाद असल्याने हे कार्य पुर्णत्वास जाऊ शकले..
धार्मिक संप्रदायाची ही परंपरा यापुढे देखील आपण अशीच अविरत चालू ठेवणार असून लातूर येथे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय भजन-कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प.पू.गहिनीनाथ महाराज औसेकर, प.पू.गोरख महाराज औसेकर, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, भाजपा प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, निलंगा भाजपाचे शहराध्यक्ष अॅड.विरभद्रजी स्वामी, पंचायत समितीच्या सभापती सौ.राधाताई बिराजदार, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.पंडीतजी धुमाळ, सय्यद युसुफजानी भाई कादरी, श्री.किरणजी उटगे, श्री.अशोकजी चिंते, अॅड.शामजी कुलकर्णी, श्री.लिंबनजी रेशमे, श्री.शिवाजी रेशमे जी, नसिमभाई खतीब, नगरसेवक इरफानभाई सय्यद, श्री.शरदजी पेठकर, अकमलभाई कादरी, सय्यद कादरीभाई, अजगरभाई कादरी, शफोद्दिनभाई सौदागर, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.