शिरूर अनंतपाळ व देवणी येथे नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने विजय संकल्प सभा संपन्न झाली.
भारतीय जनता पक्ष हा विकासाची कास धरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. जनतेला विकास अपेक्षित असतो. त्यांच्या अनेक समस्या गेल्या पंचवार्षिकमध्ये मार्गी लागल्या आहेत. येत्या काळात अधिक व्यापक होऊन विकास साधला जाईल. जनता अतिशय खंबीरपणे सर्व उमेदवारांच्या साथीने उभी आहे. त्यामुळे ही संकल्प सभा निश्चित सार्थकी लागेल हा विश्वास आहे.
यावेळी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.एजाजजी देशमुख, श्री.संभाजीराव पाटील शिरूर अनंतपाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीमती जयश्रीताई पाटील, जेष्ठ नागरिक श्री.व्यंकटेशजी देवशेटवार, श्री.धोंडीरामजी सांगावे, श्री.शंकरजी बेंबळगे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, सांस्कृतिक सेल संयोजक श्री.शैलेशजी गोजमगुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, कृषी सभापती श्री.गोविंदजी चिलकुरे, तालुकाध्यक्ष श्री.मंगेशजी पाटील परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.