भाजपा आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढणार आणि बहुमताने जिंकणार! लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह झालेल्या सकारात्मक बैठकीत आगामी निवडणुकीबाबत हा निर्धार अधिक दृढ झाला!!!
प्रणवश्री मंगल कार्यालय येथे सर्वार्थाने परिपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटन मंत्री श्री.संजयजी कौडगे यांनी भाजपाची बुथ रचना, निवडणुकीची पूर्वतयारी व इतर कामाचा आढावा घेऊन अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेली मते ही विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या एकूण मतापेक्षा अधिक आहेत, असे निवडणुकीचे विश्लेषण करता येत असेल तरीही झालेल्या मताच्या विभाजनाचा विचार करावा लागेल.
येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाने केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे हीच आपली प्राथमिकता आहे. भाजपाच्या काळातील राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने जिल्हा परिषदेला, दवाखाना, शाळा यासह विविध विकास कामाकरिता कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाच्या इमारती आज तयार आहेत. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी विकास कामे लोकार्पण करून नागरिकांना याबाबत अवगत करून देणे आवश्यक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकास कामासाठी एक रुपया दिला नाही, ही वास्तविकता देखील जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे.
या बैठकीत खा.श्री.सुधाकरजी शृंगारे, प्रदेश प्रवक्ते श्री.गणेशदादा हाके, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.सुधाकरजी भालेराव, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीपराव देशमुख जी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “मन की बात” याबाबत श्री.रामचंद्रजी तिरुके यांनी, तर बुथ रचना कार्याचा आढावा श्री.तुकारामजी गोरे यांनी सादर केला. तत्पूर्वी जिल्हा सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे यांनी प्रास्ताविक केले तर बैठकीचे सूत्रसंचालन श्री.चंद्रकांतजी कातळे यांनी केले.
या बैठकीस भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विनायकराव पाटील जी, भाजपा प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, सभापती श्री.रोहिदासजी वाघमारे, श्री.गोविंदजी चिलकुरे, श्री.रामचंद्रजी तिरुके, श्री.अशोकजी केंद्रे, श्री.त्र्यंबकआबा गुटे, सौ.जयश्रीताई पाटील, श्री.बापूराव राठोड जी, श्री.बालाजी गवारे जी यांच्यासह बैठकीस संपूर्ण जिल्ह्यातील भाजपाचे पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

©Copyright 2020 Sambhaji Patil Nilangekar, All Rights Reserved.