लातूर शहर जिल्हा भाजपाचे पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व नगरसेवक यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
भाजपा पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करताना पक्षाने आपल्याला एक ओळख दिली आहे. आता आपल्या कामाची ओळख करून देण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन केले. एक पदाधिकारी अथवा नगरसेवक, आमदार या भूमिकेतून कार्य करताना आपले अंतिम ध्येय राष्ट्रसेवा आणि विकास हेच आहे; ही जाणीव ठेऊन सर्वजण कार्यरत आहोत म्हणून आपल्या कार्याचा वेग अधिक आहे. आगामी निवडणुका आपण जिंकणारच आहोत, पण आपल्या कार्याची ओळख करून देण्याची वेळ आली आहे. अधिकाधिक नागरिकांना भेटून आपल्या वेगवान कार्यातील वेगळेपणाची ओळख करून देण्याचे आवाहन केले.
या बैठकीची सुरुवात भारतरत्न स्व.लता मंगेशकर जी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर बैठकीचे प्रास्ताविक लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे यांनी केले.
या बैठकीस संघटन सरचिटणीस श्री.मनीषजी बंडेवार, मनपा गटनेते ॲड.शैलेशजी गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती श्री.दीपकजी मठपती, सभापती श्री.मंगेशजी बिराजदार, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री.अजितजी पाटील कव्हेकर, माजी उपमहापौर श्री.देविदासजी काळे आदी मान्यवर व शहर जिल्हा भाजपाचे सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

©Copyright 2020 Sambhaji Patil Nilangekar, All Rights Reserved.