इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या निलंगा शाखेचा उद्घाटन समारंभ शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे संपन्न झाला.
डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशी संस्था कार्यरत असणे ही काळाची गरज आहे. या क्षेत्रातील लोकांना एका छत्राखाली संघटित केल्याने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित सहकार्य होईल.
वैद्यकीय क्षेत्रात आपले निलंगा तसे पुढारलेले आहे. येथील वैद्यकीय सेवा आधुनिक आहेत. कोविड काळात देखील अगदी लातूर शहरातील नागरिक उपचारासाठी निलंगा येथे येत असल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. निलंगा नगरीचा हा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि अधिक सक्षम वैद्यकीय सेवा उभी करण्यासाठी ही संस्था हातभार लावेल असा विश्वास वाटतो.
या उद्घाटन प्रसंगी निलंगा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.