72 hours

ते ७२ तास

आपल्या सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरी राजा. आपल्या ताटात अन्नाचा घास यावा यासाठी दिवसरात्र राबत असतो. त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला शब्दांत मांडणे अपुरे ठरेल. आपण खरंच किती जाणतो त्याच्या वेदनांना, आपण किती जाणतो त्याच्या भावनांना? अनेक संकटांवर मात करूनही पुन्हा नव्या आशेने नव्या जोमाने काम करणाऱ्या बळीराजाला खूप कमी लोक समजू शकतात. त्यासाठी स्वतःचे हस्तिदंती मनोरे सोडून जमिनीवर उतरावे लागेल. तेव्हा कुठे आपल्याला त्यांच्या वेदना समजू शकतील. आपल्या राज्यात असे खूप कमी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना शेतकरी बांधवांच्या अडचणी समजतात.  

याच संवेदनशीलतेला जागून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकरी बांधवांसाठी ७२ तासांचे प्राणांतिक उपोषण केले होते. २०२१ च्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि नदीपात्रातून सोडलेले पाणी यामुळे अस्मानी व सुल्तानी या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा आक्रोश तेव्हाच्या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत पोहचलेला नव्हता. शेतकर्‍यांना मदत मिळावी याकरीता सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी विरोधीपक्ष म्हणून आपली आहे या प्रामाणिक भावनेतून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरकारला धारेवर धरले. परंतु असंवेदनशील सरकार पर्यंत शेतकर्‍यांचा आवाज पोहचत नव्हता. अखेरीस शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर लातूरमध्ये उपोषणाला बसले.

ऐन नवरात्रीच्या काळात सुरु झालेल्या उपोषणाला महिला भगिनींचा सहभाग पाहता त्यांच्या रूपाने जणू आई भवानीच आशीर्वाद देत होती. त्या भारवलेल्या वातावरणात समाजातील प्रत्येक स्तरातून लोक सहभाग वाढत होता. शाळकरी मुले, माता भगिनी, आबालवृद्ध इतकेच नव्हे तर दिव्यांग बांधव सुद्धा उत्सहाने सहभागी झाले होते. तरुणांचा वाढता उत्साह आणि जेष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग समाजाला प्रेरणा देत होता.        त्या वर्षी झालेल्या बेसुमार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शासन दरबारी निव्वळ वेळकाढूपणा सुरु होता. शेतकरी बांधवांच्या अगदी माफक नुकसानभरपाईच्या मागण्या होत्या. परंतु सत्ताधारी त्यांच्या मागण्यांना जुमानत नव्हते. दि. 11, 12 व 13 ऑक्टोबर 2021 रोजी 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांना सहभागी होण्यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आवाहन केले होते. सर्वांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत मोठ्या संखेने सहभागी होत आंदोलन यशस्वी करून दाखवले. अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधीने बळीराजासाठी केलेले ७२ तासांचे अन्नत्याग उपोषण इतिहासात नक्कीच आठवले जाईल. कारण प्रामाणिकपणे केलेल्या कामाला कधीच अंत नसतो, काळाच्या पटलावर अशी आंदोलने संघर्षाची प्रेरणा देत असतात.