आ. अक्कांच्या हस्ते १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
लातूरचे भूमिपुत्र, माझे मित्र श्री. प्रशांतजी गिरबने (डायरेक्टर जनरल, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर, पुणे) यांच्या सहकार्याने, अक्का फाऊंडेशन तर्फे १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..!
निलंगा येथे ०७, शिरूर अनंतपाळ येथे ०३, देवणी येथे ०३ व कासार शिरसी येथे ०२ असे आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्री.विकासजी माने, तहसीलदार श्री. गणेशजी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्री. श्रीनिवासजी कदम, उपजिल्हा रुग्णालय, निलंगाचे वैद्यकीय अधिक्षक श्री.दिलीपजी सौंदळे, निलंगा नगरीचे नगराध्यक्ष श्री. बाळासाहेबजी शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेहमीप्रमाणे याही समाजोपयोगी उपक्रमासाठी पुढाकार घेऊन सुनियोजित पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी युवा नेते श्री. अरविंद पाटील निलंगेकर प्रयत्नशील होते. हा उपक्रम अनेक रुग्णांसाठी सहाय्यभूत होणार आहे.