आनंदवाडी येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील उपकुलगुरू यांच्या आर्थिक सहकार्यातून शहीद सैनिक बालाजी माले या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

आनंदवाडी येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील उपकुलगुरू यांच्या आर्थिक सहकार्यातून शहीद सैनिक बालाजी माले या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक आदर्श कामे झालेली असून आनंदवाडीने केवळ लातूरच नव्हे तर राज्यभरात नावलौकिक संपादन केला आहे. आनंदवाडीकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. जागतिक महासत्ता बनण्यासाठी देशाच्या आर्थिक उलाढालीत महिलांचा मोठा वाटा असणे अपेक्षित आहे. याच अनुषंगाने आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांनी आपले योगदान देण्यास सुरुवात केली आहे. निलंगा तालुक्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून या गावाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे या गावाच्या कोणत्याही कार्यासाठी मी नेहमीच उपलब्ध असून आपणास आवश्यकता वाटेल तेव्हा मला नक्की सांगावे असे आनंदवाडीकरांना आश्वासित केले.
त्याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीरमणजी लाहोटी, संवेदनाचे कार्यकारी संचालक श्री.सुरेशदादा पाटील, शहीद सैनिक बालाजी माने यांचे वडील श्री.बापूराव माने, युवा नेते श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, श्री.रोहितजी पाटील, श्रीमती भाग्यश्री चामे, श्री.परमेश्वरजी हसबे, श्री.शंकरराव साळुंखे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी चेवले यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.