Loading...

आपल्या लातूर मध्ये १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण अभियानाचा शुभारंभ आज श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय येथून करण्यात आला!

आपल्या लातूर मध्ये १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण अभियानाचा शुभारंभ आज श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय येथून करण्यात आला!

जागतिक स्तरावरील मार्गदर्शक तत्वानुसार पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी वय वर्षे १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लातूर येथे या मोहिमेचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद झाला.
लसीकरणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सहा दिवसांमध्ये २५०० डोस उपलब्ध असून पुढील टप्प्यात वेगाने लसीकरण पूर्ण करून घेण्यात येईल. सर्व पात्र तरुण तरूणींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
संस्थेचे अध्यक्ष श्री.उमाकांत होनरावजी सर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.प्रेरणाताई होनराव, कार्यकारी संचालक श्री.ओंकारजी होनराव, संस्थेच्या प्राचार्या सौ.सुलक्षणा केवळराम, सौ.शोभाताई पाटील, श्री.मनीषजी बंडेवार, श्री.शिरीषजी कुलकर्णी, श्री.प्रवीणजी सावंत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.