आपण तिसऱ्यांदा निवडून दिले, विश्वास दाखविला त्यास २ वर्षे पूर्ण होत आहेत – आपण एकजुटीने पुढे जात आहोत हीच सर्वात मोठी उपलब्धी आहे.

आपण तिसऱ्यांदा निवडून दिले, विश्वास दाखविला त्यास २ वर्षे पूर्ण होत आहेत.. २ वर्षे विविध संकटांचा सामना करत – आपण एकजुटीने पुढे जात आहोत हीच सर्वात मोठी उपलब्धी आहे.
कोविड १९ मुळे थांबलेले अर्थचक्र आणि सलग २ वर्षे अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान अशा नैसर्गिक संकटांचा सामना करताना हतबल झालेली जनता ही राज्य सरकारच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे अधिकच गलितगात्र झाली.
मात्र, लातूर हा संघर्ष करणारा जिल्हा आहे. प्रत्येक संकटात मार्ग काढणारा जिल्हा आहे. ७२ तास अन्नत्याग आंदोलनात आशेचा किरण दिसताच संपूर्ण जिल्हा पाठीशी उभा राहिला आणि केवळ लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सहकार्य मिळवून देण्यात यशस्वी ठरला.
मागील २ वर्षांत, नागरिकांना मोफत घरपोच ऑक्सिजन, अँब्युलन्स, कोविड सेंटर उभारणी, मोफत अन्नधान्य वाटप, लसीकरण टास्क फोर्स माध्यमातून लोकजागृती अशा विविध प्रकारे अधिकाधिक नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असताना मिळालेला लोकसहभाग अतुलनीय होता.
लोकहिताचे कोणतेही कार्य असो, लातूरची जनता कायम पुढाकार घेते, या अनुभवाची पुन्हा निश्चिती झाली.
पुढील ३ वर्षे महत्त्वाची आहेत, विकासाची आहेत, त्यामध्ये आपले पाठबळ आणि साथ अशीच राहील हा विश्वास आहेच..!