project_anandi

‘अक्का फाउंडेशन’ संकल्पित ‘प्रोजेक्ट आनंदी’

ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांवर शाश्वत उपाय म्हणून ‘प्रोजेक्ट आनंदी’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करणे, मुलींना मोफत सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देणे. तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे ही उद्दिष्टे आहेत.