आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकर (अक्का) यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘अक्का फाऊंडेशन’, नेहमीच लोकाभिमुख कार्यांमध्ये अग्रस्थानी असते. जगातील बरीचशी अंध नागरिकांची संख्या भारतात आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये अंधत्वाचे मुख्य कारण हे मोतीबिंदू असल्याचे समोर आले आहे. मोतीबिंदू हा दृष्टीदोष उपचार आणि शस्त्रक्रियेने बरा केला जाऊ शकतो. परंतु आजही आपल्याकडे विशेषतः ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रआरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अक्का फाऊंडेशन तर्फे दृष्टी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या शिबिराचा शुभारंभ दि. १९ जून २०२२ रोजी करण्यात आळा असून तो पुढील ९१ दिवस म्हणजे १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. यादरम्यान लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यांमधील विविध गावांमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे, यासाठी अक्का फाऊंडेशन सतत प्रयत्नशील असते. या उद्देशाच्या पूर्तीसाठी अक्का फाऊंडेशन तर्फे वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत असून ‘दृष्टी’ अभियान याचाच एक पुढचा टप्पा आहे.
या अभियानाचा शुभ समारोप देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनी, १७ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे.