“अक्का फौंडेशनच्या” माध्यमातून 5000 गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य

आपली सामाजिक संस्था “अक्का फौंडेशनच्या” माध्यमातून 5000 गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन सुरु असलेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम दैनंदिन मिळकतीवर जीवन अवलंबून असणाऱ्या कामगार आणि मजूर वर्गावर सर्वाधिक झाला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मूलभूत जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचावी या कर्तव्य भावनेतून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कुटुंबियांना सहकार्य करण्याचा हा अल्पसा प्रयत्न..