आ.अक्कांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला आणि आश्र्वस्त झालो..
शासकीय रुग्णालय निलंगा येथे आ.अक्कांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे विशेष आभार मानले. कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी हे वैद्यकीय कर्मचारी सज्ज आहेत, म्हणून अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना विशेष विनंती आहे, की त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने बूस्टर डोस देखील घ्यावा तसेच लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना संसर्गाचा कमी त्रास होत आहे, रुग्णालय भरतीची टक्केवारी कमी झाली आहे असे आढळून आले आहे. म्हणून ज्यांचे लसीकरण बाकी आहे, अशांनी ते करून घेणे हितकारक ठरेल.