अल्पभूधारक शेतकरी स्व.तानाजी बाबुराव सूर्यवंशी यांची दुर्दैवी आत्महत्या… भावपूर्ण श्रद्धांजली !

अल्पभूधारक शेतकरी स्व.तानाजी बाबुराव सूर्यवंशी यांची दुर्दैवी आत्महत्या… भावपूर्ण श्रद्धांजली !
दोन दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील आंबुलगा बु येथील अल्पभूधारक शेतकरी स्व.तानाजी बाबुराव सूर्यवंशी यांनी बँकेचे कर्ज झाल्यामुळे स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. शासकीय व वैयक्तिक स्तरावर शक्य ती सर्व मदत आपण त्यांना करणार आहोत. परमेश्वर या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो…
कोणत्याही बिकट परिस्थितीत शेतकरी बांधवांनी खचून न जाता धीर धरावा. आपल्या समस्या आणि अडचणींमध्ये आम्ही कायम आपल्या पाठीशी असून त्यावर आपण मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असू, मात्र असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये ही सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती…