अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील प्रत्येक नागरिक अन्न व मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, त्याचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विविध लोककल्याणकारी योजना राबवत असून, या साठी आवश्यक असणारी नोंदणी आणि त्या माध्यमातून मिळणारे लाभ प्रत्येक नागरिकास मिळावे यासाठी कायम पुढाकार घेत आहे.

मा.ना.श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी नव्याने स्वीकारलेली विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास लाभ देण्यासाठी राज्याच्या कानापोऱ्यातील लाभार्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करत त्यांना मुख्य प्रवाहात जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.