आर्मी-नेव्ही स्टार्स आणि सिने स्टार्स फुटबॉल सामना

भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक असलेला कारगिल विजय दिवस हा आपल्या देशाच्या संरक्षण सेनेच्या महापराक्रमाची साक्ष देतो. या विजय दिनाचे औचित्य साधत २६ जुलै, २०१९ रोजी देशाचे खरे हिरोज यांची लाढवयी जिद्द तरुण वर्गास पाहता यावी यासाठी आर्मी-नेव्ही स्टार्स आणि सिने स्टार्स यांच्यात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या माध्यमातून हा रोमहर्षक सामना मोफत पाहण्याची संधी तरुणांना मिळाली.