“अशक्य ही शक्य करतील स्वामी” या विश्वासाने सकारात्मक कार्याची प्रेरणा जिथे सर्वांना प्राप्त होते अशा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रार्थना सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
ही सेवा स्वामींच्या चरणी समर्पित!
श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व पूजनीय श्री.मोरे दादा यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित भाविक सकारात्मकतेने या ठिकाणी एकत्र येतात. त्यांना या प्रार्थना सभागृहामुळे सुविधा प्राप्त होईल. हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव विकास कार्यासाठी आम्हाला आवश्यक असतो.
या वेळी झालेल्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक श्री.रतनजी रेड्डी व सूत्रसंचालन श्री.शेंडगे सर यांनी केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, श्री.शेषरावजी ममाले सर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, सभापती सौ.राधाताई बिराजदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी बाहेती, श्री.रतनजी रेड्डी, श्री.भोसले सर, श्री.शेंडगे सर, नगरसेविका सौ.सुमनताई हाडोळे आदी मान्यवरांसह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.