श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राजकारण हे अंत्योदय होण्यासाठीचे एक साधन मानले.
लोकशाहीमध्ये निवडणुका या शेवटच्या नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना आणि कार्य पोचवण्यासाठीचे माध्यम आहे, असेच मानले पाहिजे.
आज निलंगा येथील अंजठा थिएटर येथे श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त औसा विधानसभा मतदारसंघासाठी संकल्प दिन साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
एक कार्यकर्ता म्हणून आजवर जे कार्य केले, तेच यापुढेही करत राहण्याचा संकल्प यानिमित्ताने पुन्हा व्यक्त करता आला. कारण कार्यकर्ता हेच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे सर्वात मोठे पद आहे. कार्यकर्त्याने जे काम पूर्ण केले त्याचे श्रेय न घेता, पुढे काय काम करायचे आहे यासाठी कायम सज्ज असले पाहिजे अश्या अर्थाच्या साधलेल्या संवादास मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, हा सर्व कार्यकर्त्यांची मने एकजुटीने कार्यासाठी सज्ज असल्याचे द्योतक आहे.
या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष श्री. संजय दोरवे (निलंगा), श्री. सुर्यकांत शिंदे, विधानसभा निरीक्षक श्री. राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि. प. अध्यक्ष श्री. मिलिंद लातूरे, जि. प. कृषि सभापती श्री. बजरंग जाधव, प. स. सभापती श्री. अजित माने, श्री. किरणप्पा उटगे, श्री. मुक्तेश्र्वर वागदरे यांच्यासह औसा विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र व बुथ केंद्र व पदाधिकारी उपस्थित होते.