औसा ते तुळजापूर पदयात्रेदरम्यान उजनी मुक्कामी शेतकरी बांधव आणि आमदार श्री.अभिमन्यूजी पवार यांची भेट घेतली.
माजी मंत्री, आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार श्री.अभिमन्यूजी पवार यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी औसा ते तुळजापूर या पदयात्रेदरम्यान पाहिला टप्पा उजनी येथे पूर्ण झाला.
शेतकरी बांधवांचे म्हणणे प्रभावीपणे सरकारपर्यंत पोहोचावे यासाठी विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे. सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे, शेतकरी बांधवांना न्याय्य हक्क मिळवून देऊन थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत आपल्या संघर्षाची धार कमी होऊ न देणे आवश्यक वाटते.
या पदयात्रेच्या माध्यमातून आई तुळजाभवानीला “सरकारला सद्बुद्धी” मिळण्यासाठी साकडे घातले जाणार आहे. किमान त्यानंतर तरी शेतकरी बांधवांची परिस्थिती राज्य सरकारला कळेल हीच एकमेव आशा आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, श्री.बापूसाहेब राठोड जी, श्री.किरणजी उटगे आदींची उपस्थिती होती.