भाजपा संघटनात्मक संरचना संवाद – निलंगा शहरातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक आदींच्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्याच्या पुढील वाटचालीसाठी संवाद साधला.
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी त्यासाठी कालबध्द नियोजन करून ठराविक वेळेत कार्य पूर्ण करता येते हे निलंगा नगरपालिकेने दाखवून दिले आहे. मागील निवडणुकीतील जाहीरनाम्यात दिलेली जवळपास सर्व आश्वासने पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. विकासाचा एक टप्पा आपण पार केला आहे. निलंग्याचा स्वाभिमान यामुळे बळावला आहे.
आता निलंग्याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राने करावा असे कार्य पुढील काळात आपल्याला निर्माण करायचे आहे. आरोग्य आणि शिक्षण या दोन चाकांवर दूरगामी परिणाम साधणाऱ्या विकासाची पायाभरणी आपल्याला करायची आहे. या मिशनची सुरुवात “प्रत्येकास दर्जेदार शिक्षण आणि प्रत्येकास आरोग्य विमा” या मूलभूत बाबी आपल्याला प्राथमिकतेने करावयाच्या आहेत.
या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या निलंगा शहर कार्यकारिणीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अत्यंत सकारात्मक झालेल्या या बैठकीस प्रदेश सचिव श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.शेषरावजी मम्माळे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन श्री.दगडुजी साळुंके, निलंगा नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, भाजपा शहराध्यक्ष श्री.वीरभद्रजी स्वामी तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.