Loading...

बळीराजाला न्याय मिळावा व न्यायासाठी लढणार्‍या या शेतकरी बांधवांची प्रकृती लवकर बरी व्हावी ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

‘७२ तास अन्नत्याग आंदोलनात’ सहभागी असलेले शेतकरी बांधव श्री.पंडित शेषेराव शिंदे जी (शिरूर अनंतपाळ), श्री.सचिनजी गायकवाड (निलंगा), श्री.बाळासाहेबजी धनाजी बिरादार (धनेगाव, ता. देवणी) हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे…
बळीराजाच्या सहनशक्तीचा हे ढिम्म राज्य सरकार आणखीन किती अंत पाहणार आहे, हे देवच जाणे… राज्य सरकारला सुबुद्धी येऊन बळीराजाला न्याय मिळावा व न्यायासाठी लढणार्या या शेतकरी बांधवांची प्रकृती लवकर बरी व्हावी ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !