बातमी मागची बातमी या साप्ताहिकाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

बातमी मागची बातमी या साप्ताहिकाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. लातूर येथे संपादक श्री. जावेद शेख यांनी अत्यंत कष्टाने हे साप्ताहिक सुरु केले आणि यशस्वीरित्या चालवले आहे. अशा प्रामाणिक पत्रकारितेची समाजाला आवश्यकता आहे.
आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेची चौकट देखील बदलली असून त्याकडेही पत्रकारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लातूर जिल्ह्यात नवनवीन पत्रकार निर्माण होऊन या व्यवसायाची वृद्धी होत आहे, हे पाहून समाधान वाटते.
आजच्या या कार्यक्रमास तुळजापूर – उस्मानाबादचे आमदार श्री. रणाजगजितसिंह पाटील जी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुशीलजी कुलकर्णी, हासेगाव येथील सेवालयाचे श्री. रवीजी बापटले, व्ही. एस. पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोदजी खटके, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरसिंहजी घोणे व संपादक श्री. जावेदजी शेख तसेच कार्यकारी संपादक श्री. इम्रान शेख आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.