भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे सुरू असून, ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी झालो.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे सुरू असून, ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी झालो.
प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्ष नेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या या बैठकीत संघटन बांधणी, एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप, शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पुढील वाटचालीसाठी ही बैठक दिशादर्शक ठरत आहे. कोणत्याही परिस्थितीत जनसेवा हाच सर्वतोपरी महत्त्वाचा विषय असून भाजपा त्यासाठी नेहमी कटिबद्ध असेल… संपूर्ण दिवस चालणाऱ्या या बैठकीचा केंद्रबिंदू ही कटीबद्धताच असणार आहे.
लातूर येथून आमदार मा.श्री.रमेशअप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, सरचिटणीस श्री.किरणआप्पा उटगे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.भागवतजी सोट, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी चेवले, श्री.शरदजी दरेकर आदी सहभागी झाले आहेत.