Loading...

भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची बैठक संपन्न

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविलेल्या विजयी व पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
या निवडणुकीत विजयाच्या माध्यमातून जनतेने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी आगामी काळात विकासाच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडविणे आवश्यक आहे. विशेषतः शिक्षण व आरोग्य या २ क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून शिरूर अनंतपाळ नगर पंचायतीचे नवे मॉडेल संपूर्ण देशासमोर उभारणे आवश्यक आहे. पराभूत उमेदवारांनी झालेल्या पराभवाचे चिंतन करून पुन्हा एकदा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड.संभाजीराव पाटील जी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.जयश्रीताई पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष श्री.मंगेशजी पाटील, श्री.गणेशजी सलगरे आदींची उपस्थिती होती.