भारतीय जनता पार्टी, लातूर यांच्या पुढाकाराने बेघर आणि गरजूंना दररोज एक हजार भोजन पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी, लातूर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष मा. श्री. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात गरीब बेघर आणि गरजूंना दररोज एक हजार भोजन पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनाला साद देत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर यांचेही मोलाचे सहकार्य लाभलेल्या या उपक्रमामुळे लातूर शहर आणि परिसरातील गरजू नागरिकांची गैरसोय कमी झाली आहे.