Loading...

भारतीय जनता पार्टी नेहमी शेतकरी बांधवांच्या हितासाठी खंबीरपणे उभी आहे. ही वेळ पुन्हा एकदा शेतकरी राजाच्या पाठीशी उभी राहण्याची… त्यामुळे या परिक्रमेसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे.

जिल्ह्यातील मांजरा, तेरणा व तरवजा नदीकाठच्या शेतकऱ्यांची महापुराने मातीसह पिके वाहून गेली. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्यामुळे रब्बी पिके घेण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाच्या वतीने मांजरा, तेरणा, तरवजा नदीकाठची परिक्रमा करून ३०० पेक्षा जास्त गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवार भेटी घेण्यात येणार आहे.
निद्रिस्त महाविकास आघाडी सरकारला जागे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला. लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५० हजार रुपये व नदीकाठच्या शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु या सरकारने अतिशय तुटपुंजी मदत दिली. ज्या बांधवांच्या शेतातील मातीदेखील वाहून गेली त्यांना भरीव मदत अद्याप या सरकारने दिली नाही. विमा देखील अद्याप सरसकट मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मातीसह पिके वाहून गेलेल्या मांजरा, तेरणा, तरवजा या नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती पूर्ववत करण्यासाठी शासन हेक्टरी किमान २ लाख रुपये देणे गरजेचे आहे.
भारतीय जनता पार्टी नेहमी शेतकरी बांधवांच्या हितासाठी खंबीरपणे उभी आहे. ही वेळ पुन्हा एकदा शेतकरी राजाच्या पाठीशी उभी राहण्याची… त्यामुळे या परिक्रमेसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे.