भारतीय जनता युवा मोर्चा, निलंगाच्या युवकांनी “आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र” निलंगा येथे सुरू केले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा, निलंगाच्या युवकांनी “आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र” निलंगा येथे सुरू केले आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवकांनी देखील पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी अशी मार्गदर्शन केंद्रे सुरू झाली असून त्या अंतर्गत कृषी, बचत गट, उद्योग धंदे, कामगार, सेवाभावी संस्था, शिक्षण, आरोग्य, एम.एस.एम.ई. आदी विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी प्रशिक्षित करणे अशी कामे या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने, केंद्र सरकारच्या योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे केंद्र सहाय्यकारी होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी भाजयुमो प्रदेश सरचिटणीस श्रीमती प्रेरणा ताई होनराव, जिल्हा संघटन प्रमुख श्री. संजयजी दोरवे, प. स. सभापती श्रीमती राधाताई बिराजदार, तालुका अध्यक्ष श्री. शाहूराज पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरजी चेवले, केंद्राचे संयोजक श्री. तानाजी बिराजदार जी आदी पदाधिकारी, मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.