Loading...

भव्यदिव्य स्मारक

भव्यदिव्य स्मारक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दादासाहेबांना आदरांजली!

महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील अथांग कर्तुत्व असलेले कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा दिव्य स्मारक अनावरण सोहळा निलंगा येथे अतिशय हर्षोल्लासत संपन्न झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय आणि अभुतपुर्व सोहळा पार पडला. दादासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी सोहळ्यात हजारो नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवण्यास मिळाला. निलंगेकरांच्या मनात दादासाहेबांचे स्थान किती निखळ आहे, हे या सोहळ्याच्या माध्यमातून उदृत झाले.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन देऊन राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते असलेल्या आदरणीय दादासाहेबांना शासनातर्फे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत खरी आदरांजली वाहण्यात आली.