Recent Works

७ डिसेंबर आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे फंड

चार वर्षे सर्वाधिक फंड गोळा करण्यात महाराष्ट्र राज्य देशात ठरले प्रथम सन २०१५ या वर्षात २८ कोटी ९८ लाख, सन २०१६ वर्षात ३३ कोटी ३० लाख, सन २०१७ वर्षात ३४ कोटी ४७ लाख तर चालू वर्षात सध्य स्थितीला १९ कोटी ९९ लाख असा विक्रमी आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे फंड गोळा करण्यात आला.

आर्मी-नेव्ही स्टार्स आणि सिने स्टार्स फुटबॉल सामना

भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक असलेला कारगिल विजय दिवस हा आपल्या देशाच्या संरक्षण सेनेच्या महापराक्रमाची साक्ष देतो. या विजय दिनाचे औचित्य साधत २६ जुलै, २०१९ रोजी देशाचे खरे हिरोज यांची लाढवयी जिद्द तरुण वर्गास पाहता यावी यासाठी आर्मी-नेव्ही स्टार्स आणि सिने स्टार्स यांच्यात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या माध्यमातून हा रोमहर्षक सामना …

आर्मी-नेव्ही स्टार्स आणि सिने स्टार्स फुटबॉल सामना Read More »

२६ जुलै २०१९ या कारगिल विजय दिनी विशेष उपक्रम

राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्याची भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता राज्यात ५०० हुन अधिक चित्रपट गृहात मोफत दाखविण्यात आला उरी – द सर्जिकल स्ट्रईक हा चित्रपट. तब्बल अडीच लाखाहुन अधिक युवकांनी एकाच वेळी पहिला चित्रपट.

शहीद कुटुंबीयांना ४८ तासात १ कोटींची घरपोच मदत.

अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानास अपंगत्वाचे प्रमाण १% ते २५% असल्यास २० लाख रुपये मदत, ६% ते ५०% असल्यास ३४ लाख रुपये मदत, तर अपंगत्वाचे प्रमाण ५१% ते १००% असल्यास ६० लाख इतकी सन्मानपूर्वक मदत.

सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेत, चकमकीत किंवा देशाबाहेरील मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या, अपंगत्व आलेल्या जवानांच्या आर्थिक मदतीत भरगोस वाढ.

माजी सैनिक कल्याण विभाग

आपले सर्वस्व त्यागून देशरक्षणासाठी कायम कटिबद्ध असलेल्या भारत मातेच्या जनानांचे सर्वांगीण हित साधणे ही माजी सैनिक कल्याण विभागाची जबाबदारी आहे. यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या माजी सैनिक कल्याण विभागामार्फत मागील चार वर्षात अनेक आमूलाग्र बदल करून  महाराष्ट्र हे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करणारे देशात अव्वल राज्य बनले आहे. माजी सैनिक …

माजी सैनिक कल्याण विभाग Read More »

धुरमुक्त, गॅसयुक्त अन स्वस्थ महाराष्ट्र

कुटुंबाचा यशस्वीपणे गाढ ओढणाऱ्या स्त्रीला स्वस्थ आयुष्य जगता यावे तसेच राज्यातील सर्व माता-भागिनींना धूरमुक्त वातावरणात सुखकर जीवन व्यतीत करता यावे, यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान. महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना शोधून त्यांना गॅस जोडणी देण्याचे काम व वंचितांना १०० टक्के शिधा पत्रिका वाटप करण्यासाठी विशेष मोहीम. साध्यस्थीतीला एकूण १,४७,००९ इतकी विक्रमी उज्वला गॅस जोडणी. राज्यात १,५०,५९६ …

धुरमुक्त, गॅसयुक्त अन स्वस्थ महाराष्ट्र Read More »

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील प्रत्येक नागरिक अन्न व मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, त्याचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विविध लोककल्याणकारी योजना राबवत असून, या साठी आवश्यक असणारी नोंदणी आणि त्या माध्यमातून मिळणारे लाभ प्रत्येक नागरिकास मिळावे यासाठी कायम पुढाकार घेत आहे. मा.ना.श्री. संभाजी …

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग Read More »

दिव्यांगजन कौशल्य विकास कार्यक्रम

दिव्यांग कायदा २०१६ च्या अनुषंगाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत दिव्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करून देणार.

राज्य शासनामार्फत विधवा परीत्यक्त्या घटस्फोटीत महिला यांच्या करिता कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजना

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत या महिलांना आधार देणे, परिपूर्ण, स्वावलंबी बनवणे व त्यास स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.