चाकुर पंचायत समितीतर्फे तालुक्यातील आदर्श शिक्षकांना विधानपरिषद विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते काल पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तसेच बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव काळात जे जनसेवेत अग्रेसर होते अशा नागरिकांना कोव्हिड योद्धा सन्मानाने गौरवण्यात आले.
शिक्षक हे समाजासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. भावी पिढी घडविणारे शिक्षक यांना केंद्रस्थानी ठेऊन योजनांची आखणी मागील सरकारच्या काळात केली गेली आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी देखील झाली. शिक्षकास प्रोत्साहित केले तर पिढी घडते, पिढी घडली तर राष्ट्र घडते हे तत्त्व लक्षात घेऊन राज्यात कोणाचेही सरकार असेल तरी आम्ही शिक्षकांच्या हिताचे निर्णय घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. रमेशअप्पा कराड, आमदार श्री. अभिमन्यूजी पवार, आमदार श्री. बाबासाहेब पाटील जी, माजी आमदार विनायकराव पाटील जी, श्री. बब्रूवानजी खंदाडे, प्रदेश प्रवक्ते श्री. गणेशजी हाके, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंखे, श्री. रोहिदासजी वाघमारे, पंचायत समिती सभापती सौ.जमुनाताई बडे, उपसभापती श्री. सज्जनकुमार लोनाले जी, पत्रकार श्री. विलासजी बडे आदी मान्यवर उपस्थित होते.
