छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून ज्येष्ठ शेतकरी बांधवांच्या हस्ते ‘७२ तास अन्नत्याग आंदोलन’ पूर्ण झाले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली, पण शेतकऱ्यांसाठी ती पुरेशी ठरणार नाही, म्हणून हा संघर्ष पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी केला आहे.
आज सकाळी २ शेतकरी बांधव रुग्णालयातून परतले, पण नंतर दिवसभरात सुमारे १४ शेतकरी बंधू-भगिनींना रुग्णालयात दाखल करावे लागले. तरीही मागे न हटण्याची त्यांची वृत्ती हाडाचे शेतकरी असल्याचे सिद्ध करणारी होती.
सकाळी ०८:३० वाजताच नांदेडचे खासदार मा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकरजी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर या देखील दुपारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीमधील अनेक नेत्यांनी फोनवर संपर्क साधून आंदोलनासाठी शेतकरी बांधवांना पाठिंबा जाहीर केला.
केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दादा दानवे जी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.डॉ.भागवतजी कराड, माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव श्रीमती पंकजाताई मुंडे जी, आमदार श्री.आशिषजी शेलार या मान्यवर नेत्यांनी आज व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आंदोलनास सदिच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी या जनआंदोलनाला महाराष्ट्रातील प्रत्येक गावात घेऊन जाईल, शेवटच्या शेतकरी बांधावाला न्याय देऊनच हे आंदोलन पूर्ण होईल असा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त करून शेतकरी बांधवांचे मनोधैर्य वाढवले. या सर्व नेत्यांच्या पाठबळामुळे शेतकरी बांधवांचा उत्साह वाढतो राहिला…अनेक सामाजिक संघटना आज देखील मोठ्या सदस्य संख्येसह आंदोलनास पाठिंबा देण्यास प्रत्यक्ष उपस्थित होत्या.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडियो संदेशाद्वारे केलेल्या आवाहनानंतर आंदोलनाचा समारोप झाला. मा.देवेंद्रजींनी अतिवृष्टी झाल्यापासूनच आपुलकीने शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष भेट देऊन दिलासा देण्याचे कार्य हाती घेतले होते. मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मिळवून दिलेली नुकसानभरपाई सर्वज्ञात आहे, त्यांच्या शब्दावरील विश्वास अजूनही नागरिकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे त्यांच्या आवाहनानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनाची सांगता झालेली असली तर हा लढा अजून संपलेला नाही. शेतकरी बांधव एकत्र आले. सामान्य नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी शेतकरी बांधवांना पाठिंबा दिला. यातच आंदोलनाचे यश आहे. त्यानंतर सरकारने केलेली तुटपुंजी मदत म्हणजे आपल्या आंदोलनाने कुंभकर्णी सरकारला जागे करण्याचे काम झाले. आता येत्या काळात आपण आपल्या हक्काची संपूर्ण मदत मिळवून घेऊ..
शेतकरी बांधव, समस्त लातूरकर, जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना, पोलीस प्रशासन, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्ञात अज्ञात ज्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार!
जय जवान, जय किसान.
भारत माता की जय!