कोरोना संसर्ग नियंत्रण, नियोजन आणि उपाययोजना तसेच जल व्यवस्थापन, घरकुल अशा इतर अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात आले.

कोरोना संसर्ग नियंत्रण, नियोजन आणि उपाययोजना तसेच जल व्यवस्थापन, घरकुल अशा इतर अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आदी महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांसह आढावा बैठकीचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात आले.
कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढू नये यासाठी संपूर्ण यंत्रणेस आवश्यक प्रतिबंधात्मक सूचना देऊन, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास अत्यावश्यक कॉट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी आवश्यक बाबींची उपलब्धता करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मदनसुरी, औरद शहा., रामलिंग मुदगड आदी ठिकाणी बांधण्यात आलेल्या नवीन दवाखान्यांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून तात्काळ तपासणी व उपचार सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे तसेच विशेषतः ६० वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन त्यांच्या संचारावर विशेष देखरेख ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
टंचाईच्या काळात वाढत्या उन्हाचा जोर लक्षात घेता बोअर, विहीर अधिग्रहण, पुनर्भरण करण्यास गावांची पाहणी करून यादी करण्यासंदर्भात सूचना केल्या.
विशेषतः घरकुल योजने अंतर्गत २०२२ सालची मर्यादा दिलेल्या सर्वांना तात्काळ मान्यता देऊन त्यांच्या अडचणी आणि उपाययोजना यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.
आरोग्य, जल, घरकुल अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित या बैठकीमध्ये आवश्यक कार्यवाहीचे कालबद्ध नियोजन करण्यात आले तसेच नागरिकांना थेट लाभ मिळण्यासाठी आवश्यक आदेश देण्यात आले..